Monsoon Rain : राज्यातील या 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…!
महाराष्ट्राला दिलासा देणार बातमी आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावण्यास सुरुवातही केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापुरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह नांदेडमध्येही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलंय. त्यामुळे केरळसह अंदमान निकोबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भंडाऱ्यात पावसाची हजेरी..
भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलं. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री 12 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामात धान पिकांची लागवड केली असून धान पीक कापणीला आला आहे. त्यामुळे धान पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रात गुंठ्यांमध्ये शेतजमिनीची खरेदी विक्री…!
कुठे कुठे पाऊस होणार?
पश्चिम बंगालसह ईशान्येकडील सात राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरु झालाय. त्यामुळे पावसासाटी अनुकूल वातावरण तयार झालंय. अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात हे वारे दाखल होण्याचा अंदाज आहे. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस बरसेल, अशी शक्यता हवमान विभागानं वर्तवली आहे.
source : tv9marathi