Monsoon Update : माॅन्सून पुण्यापर्यंत दाखल!

Monsoon Update : माॅन्सून पुण्यापर्यंत दाखल!

 

शुक्रवारी तळकोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत माॅन्सूनने  मजल मारली होती. त्यानंतकर शनिवारी (ता. ११) मुंबई  ठाणे, पुणे  डहाणपर्यंत माॅन्सून दाखल झाला, असं हवामान विभागानं जाहिर केलं. पुढील ४८ तासांत माॅन्सून आणखी काही भाग व्यापण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.

यंदा नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच म्हणजेच २९ मे रोजी मॉन्सूनचे देवभुमी केरळमध्ये आगमन झालं होतं. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर दोन दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असतानाच मॉन्सूनचा वेग मंदावला. संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यावर पोचलेल्या मॉन्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी १० दिवसांची वाट पहायला लागली. २०१९ मध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास २० जून तर २०२० मध्ये ११ जून उजाडला होता. तर गतवर्षी मॉन्सून ५ जून रोजी महाराष्ट्रात पोचला होता.

पोषक हवामान असल्याने माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. शुक्रवारी (ता.१०) माॅन्सूनने तळकोकणापर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झालेल्या माॅन्सूनने शनिवारी (ता.११) राज्यात वेगाने प्रावस केला. राज्याच्या किनारपट्टीसह काही भाग माॅन्सूनने व्यापला. मुंबई, ठाणे, पुणे, डहाणपर्यंत माॅन्सून दाखल झाला, असं हवामान विभागानं जाहिर केलं. शुक्रवारपासून या भागांत पाऊस पडत होता.

हे पण वाचा:- Soybean Rate : सोयाबीनच्या दरात दणक्यात वाढ; चारच दिवसात बदलले चित्र!

मॉन्सूनने अरबी समुद्रावरून पुढे प्रवास करत कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत प्रगती केली. राज्यात पूर्व मोसमी पावसानेही जोर धरला असून, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान झालंय. पुढील ४८ तासांत माॅन्सून मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत चाल करून गुजरात राज्याच्या काही भागांत दाखल होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत.

source:- ऍग्रोवोन