Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा सविस्तर माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा सविस्तर माहिती

 

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा मान्सूनची जातकाप्रमाणे वाट पाहत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून यावर्षी लवकर येईल असे सांगितले होते. पण खऱ्या अर्थाने मान्सून राज्यात दाखल झाला नाही. मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे.

पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज

पंजाबराव डख यांच्या मते मान्सून राजधानी मुंबईत 6 जूनला (Mumbai) म्हणजे आज येणार आहे. आणि 7 जूनला बहुतांशी भागात मान्सून हा पोहोचणार आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचं डख यांनी सांगितलं. यामुळे शेतकरी बांधवांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत एवढे मात्र नक्की.

माढा तालुक्यातील मानेगाव इथे सुभेदार गणेश लांडगे यांच्या सैन्य सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पंजाबराव डख बोलत होते. रिमझीम पाऊस चागला असतो.

हे पण वाचा : 11 वा जमा आता 12 व्या हप्तासाठी काय आहेत नियम-अटी…!

त्यामुळं झाड लावणं काळाची गरज असल्याचे डख म्हणाले. पुण्याकडे पाऊस हा रिमझीम पडतो. कारण त्याठिकाणी झाडांचे प्रमाण जास्त असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.

source : krishijagran