Punjab Dakh Havaman Andaj : 8 ऑगस्ट पर्यंतचा पंजाब डख यांचा मान्सून हवामान अंदाज आला..! कुठं-कुठं कोसळणार पाऊस

Punjab Dakh Havaman Andaj : 8 ऑगस्ट पर्यंतचा पंजाब डख यांचा मान्सून हवामान अंदाज आला..! कुठं-कुठं कोसळणार पाऊस

शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख यांच्या मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी भविष्यवाणी केली आहे.

शेतीचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे.

पंजाबराव यांच्या मते 8 ऑगस्ट पडणारा हा पाऊस सर्वदूर नसणार, म्हणजेच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान कोरडे राहणार आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, ३ ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन कायम राहणार आहे. पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 3 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे पण वाचा :- संपूर्ण राज्यात आजपासून होणार ‘ई-पीक पाहणी’ची नोंदणी, ‘या’ मिळणार सुविधा

३ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर अतिशय मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता या वेळी पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

पंजाबराव डख यांनी मान्सूनच्या अंदाजा समवेतच शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. डक यांच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओल तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे.

source :- krushi jagran