Punjab Dakh Havaman Andaj : पंजाब डख यांनी केला जुलै महिण्याचा हवामान अंदाज जाहीर; वाचा सविस्तर

Punjab Dakh Havaman Andaj : पंजाब डख यांनी केला जुलै महिण्याचा हवामान अंदाज जाहीर; वाचा सविस्तर

 

सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे पावसाकडे लागले आहे, जून महिना संपत आला तरी अजून पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेकांच्या पेरण्या यामुळे रखडल्या आहेत. यामुळे आता जुलै महिन्यात तरी पाऊस पडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दहा जूनला राज्यात दाखल झालेला मान्सून आता संपूर्ण राज्यात दाखल झाला आहे. मात्र पावसाचे आगमन अजूनही होत नाही.

असे असताना मात्र आता राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे लवकरच राज्यात जोरदार पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. आता हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम अंदाज देखील आता जाहीर करण्यात आला आहे. या नवीनतम अंदाजात पंजाबराव डख साहेबांनी जुलै महिन्यापर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.

पंजाबरावांच्या नवीनतम अंदाजाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या नवीन अंदाजानुसार, राज्यात कालपासून मान्सूनच्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कालपासून सुरू झालेला मान्सूनचा पाऊस जवळपास दोन जुलै पर्यंत कायम राहणार आहे. दोन जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे. याची व्याप्ती संपूर्ण राज्यात असेल.

यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या आणि पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. डख यांच्या मते, 23 जून पासून राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे. 23 जून ते 27 जून या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता हवामान तज्ञ पंजाबराव यांनी सांगितले आहे. यामुळे गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सगळीकडे हजेरी लावेल.

हे पण वाचा : राज्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होतेय फसवणूक

यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांची सगळी तयारी झाली आहे, मात्र केवळ पाऊस पडत नसल्याने त्यांची सगळे गणित बिघडले आहे. काही ठिकाणी शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे देखील उरकली आहेत. अशा भागातील शेतकरी बांधव आता मान्सूनच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. यामुळे तो कधी एकदाचा कोसळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

source: krushijagran