Weather Update : राज्यात वाढणार पावसाचा जोर, ‘या’ जिल्यांमध्ये यलो, ऑरेंज,रेड अलर्ट जारी

Weather Update : राज्यात वाढणार पावसाचा जोर, ‘या’ जिल्यांमध्ये यलो, ऑरेंज,रेड अलर्ट जारी

 

मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची मुसळधार कायम आहे. तर विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र, मॉन्सूनचा दक्षिणेकडे सरकलेला आस, गुजरात पासून ते कर्नाटकपर्यंत पश्‍चिम किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

आज (ता. १०) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिकसह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उत्तर मराठवाडा आणि सपूर्ण विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या अनुपगडपासून कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारला आहे.

हे पण वाचा :- महाकृषी ऊर्जा योजनेतून कृषिपंपांना मिळणार सौरऊर्जेची जोड

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

source :- agrowon