Weather updates : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज! कुठे तुरळक आणि कुठे होणार मेघगर्जना

Weather updates : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज! कुठे तुरळक आणि कुठे होणार मेघगर्जना

 

राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाथा, तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार तर मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मान्सूनची आगेकूच होत असली तरी त्याचा वेग मंदावला आहे. राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या भागात पुढील पाच दिवस मुसळधार; धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर सातारा सांगली भागात तुरळक पाऊस होणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश पार करून राजस्थानच्या दिशेने मान्सूनची वाटचाल सुरु आहे. मात्र त्याचा वेग काहीसा मंदावला आहे.

या ठिकाणी मुसळधार पाऊस

 • पालघर
 • ठाणे
 • रायगड
 • रत्नागिरी
 • सिंधुदुर्ग

या ठिकाणी तुरळक पाऊस

 • धुळे
 • नंदुरबार
 • जळगाव
 • नाशिक
 • नगर
 • कोल्हापूर
 • सातारा
 • सांगली

या भागात मेघगर्जना (विजांच्या कडकडाटासह)

 • सोलापूर
 • औरंगाबाद
 • जालना
 • परभणी
 • बीड
 • हिंगोली
 • नांदेड
 • लातूर
 • उस्मानाबाद

मालेगाव

मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांचं बरंच नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पाट फुटलाय. अचानक पाट फुटल्याने एक तरुण पाण्यात अडकला होता. तालुक्यात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

हे पण वाचा : या जिल्ह्यातील बी-बियाणं, खतांच्या किमतीत वाढ..!

नागपूर

नागपूरमध्ये गेल्या काही दिवसात चांगला पाऊस पडला होता. आता मात्र पावसाने दडी मारलीये. बरेच दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर नागपूरकरांना आता उन्हाच्या झळा सोसोव्या लागतायत. नागपूरमध्ये उन्हाचा पारा चांगलाच चढलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली जात होती परंतु आता पारा चढल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा फोल ठरलीये. नागपूरचं तापमान दोन अंशाने वाढले आहे. आता नागपूरचं तापमान 35 अंश सेल्सियास पर्यंत पोहोचलंय. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडण्याची शक्यता आहे. उकाड्याला सुरवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

source : tv9 marathi